वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
#caraccident #accidentvideo #Accident #Maharashtra pic.twitter.com/Pn1LHpeMvG
— Khushbu Goyal (@kgoyal466) February 7, 2025
मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल व्हिडिओ नाशिक शहरातील असून एका हॉटेल एक्स्प्रेस इनच्या परिसरातील आहे. मृत मुलाचे नाव ध्रुव राजपूत असे आहे. चालकाविरोधात ध्रुवचे वडील अजित राजपूत (३७, उपेंद्रनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील एक्स्प्रेस इन हॉटेलच्या आवारात बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. ध्रुवचे वडील हे ओला, उबर चे नोंदणीकृत चालक आहेत. बुधवारी सायंकाळी आपल्या ग्राहकाला सोडण्यासाठी मुलगा ध्रुव आणि मुलगी हर्षदा या दोघांना बरोबर घेऊन हॉटेल एक्स्प्रेस इनमध्ये गेले होते. ग्राहकाला हॉटेलमध्ये सोडत असताना त्यांची दोन्ही मुले आवारात खेळत होती. त्याचवेळी हॉटेलच्या प्रवेशद्वारातून वेगाने आतमध्ये आलेल्या मोटारीखाली ध्रुव सापडला. त्याच्या अंगावरून चाक गेल्याचे सांगितले जाते. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणी संशयित वाहन चालकाविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिमुकल्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.