“तिचं एक पाऊल तिला मृत्यूच्या दारात घेऊन गेलं”, ट्रेनच्या दारात उभे असताना झाला अपघात

Train viral सोशल मीडियावर दर दुसऱ्या दिवशी अनोखे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातले काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही व्हिडीओ पाहून आपल्याला धक्काच बसतो. असे व्हिडीओ आपल्या कायम लक्षात राहतात. या डिजिटल युगात कोणतीही गोष्ट व्हायरल व्हायला जास्त वेळ लागत नाही. अशामध्ये अनेकदा स्टंटचे व्हिडीओदेखील व्हायरल होत असतात. ट्रेनमध्ये अनेकदा रीलसाठी जीवघेणा स्टंट करणाऱ्या तरुणांना तुम्ही पाहिलं असेलच.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

आपण सिनेमांमध्ये अनेक वेळा स्टंटबाजी करताना पाहिली असेल, पण ते स्टंट खूप काळजी घेऊन केले जातात. सिनेमाची गोष्ट सोडली तर आता अनेक जण प्रत्यक्षात प्रसिद्धी, सोशल मीडियावरील काही व्ह्युज, लाइक्ससाठी स्वत:चा जीव धोक्यात घालतात. असे व्हिडीओ पाहून अनेकदा आपल्याच अंगावर काटा येतो. सध्या असाच जीवघेणा स्टंट एका तरुणीने केलाय आणि हा स्टंट तिच्या अंगलट आला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक तरुणी रीलसाठी आपला जीव धोक्यात टाकताना दिसतेय. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, ट्रेन वेगात चालत असताना तरुणी ट्रेनच्या दरवाजाजवळ जाते आणि दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला लटकून उभी राहते. तेवढ्यात अचानक तिचं डोकं एका खांबाला आपटतं. खांबाला आपटल्यानंतर ती ट्रेनला पकडून उभी राहते जेणेकरून ती खाली कोसळत नाही.पण व्हिडीओमध्ये असं दिसून येतंय की तिला खूप जोराचा मार लागला आहे.

 

Leave a Comment