ST bus new rate नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ यांच्यातर्फे चालवल्या जाणाऱ्या आवडेल तिथे प्रवास या योजनेबद्दल माहिती घेणार आहोत तसेच या योजनेमध्ये राज्य सरकारने आत्ताच एक मोठा बदल केलेला आहे. त्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेणार आहोत.
मित्रांनो तुम्ही ऐकलं असेल की महामंडळाने सध्या सर्व एसटीच्या भाड्यामध्ये दरवाढ केलेली आहे. त्यामुळे सामान्य लोकांना मोठा फटका बसला आहे. आता त्यातच एसटी महामंडळातर्फे चालवल्या जाणाऱ्या आवडेल तिथे प्रवास या योजनेच्या दरांमध्ये सुद्धा मोठा बदल करण्यात आलेला आहे. याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊ.
राज्य महामंडळाने केलेली भाडेवाढ ही 25 तारखेपासून लागू करण्यात आली होती आणि आता आवडेल तिथे प्रवास या योजनेमध्ये केलेली भाडेवाढ ही 1 फेब्रुवारीपासून लागू करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये विविध तीर्थस्थळे, पर्यटन स्थळे आणि इतर प्रेक्षणीय स्थळे खूप मोठ्या प्रमाणात आहेत. आणि इथे लोकांना भेट देता यावी आणि ही भेट स्वस्त दरामध्ये देता यावी याकरिता महाराष्ट्र राज्य मार्ग महापरिवार महामंडळाने आवडेल तिथे प्रवास योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत महामंडळाकडून चार आणि सात दिवसांचे असे विविध प्रकाराचे पास देण्यात येतात.
हे पास काढल्यानंतर तुम्ही चार दिवस किंवा सात दिवस संपूर्ण महाराष्ट्रभर कुठे प्रवास करू शकतात. त्यासाठी तुम्हाला अधिकचे पैसे द्यावे लागणार नाहीत. यासाठी फक्त तुम्हाला पास ची रक्कम जमा करावी लागेल आणि पाहिजे तेवढा प्रवास तुम्ही करू शकता.
योजनेबद्दल काही नियम
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांनी महामंडळाने या योजनेबद्दल काही नियम आखून दिलेले आहेत ते नियम आपण सविस्तर पाहूया.
पहिला नियम म्हणजे या योजनेअंतर्गत तुम्हाला फक्त सात किंवा चार दिवसांचा पास मिळेल.
जर तुम्ही साध्या सेवेचे पास काढला असेल तर हा पास साध्या बसेस साठीच म्हणजे साधी, जलद, रातराणी आणि शहरी, यशवंती आंतरराज्य मार्गासह या गाड्यांमध्ये हा पास ग्राह्य धरला जाईल.
या योजनेचा पास तुम्हाला काढायचा असेल तर दहा दिवस अगोदरच तुम्हाला पास काढता येईल. त्याच्यापेक्षा एक महिना आधी किंवा आधीच पास काढून ठेवता येणार नाही. 10 पेक्षा अधिक दिवसांच्या आधी पास काढून ठेवता येणार नाही.
या योजनेचा पास हा यात्रेसाठी किंवा कोणत्याही जादा बसेस सोडले असतील या सर्व बसण्यासाठी लागू असेल.
कंडक्टरने समोरील व्यक्ती पास धारक आहे म्हणून प्रवेश ना करू शकणार नाहीत.
या योजनेतील पास धारकांना महामंडळ आसनाची हमी देत नाही. परंतु तुम्ही तुमचे आसन आरक्षित करू शकता.
तुम्ही जर पास धारक असाल तर तुमच्या सोबत बारा वर्षाखालील तसेच 30 किलो पेक्षा कमी वजनाच्या मुलाला तुम्ही सोबत विनाकार विनामूल्य नेऊ शकता. तसेच तुम्ही 15 किलो सामान सुद्धा सोबत घेऊन जाऊ शकता.
पासधारकाला महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे मंडळाची बस जाते तिथपर्यंत प्रवास करण्याची हमी आहे आणि परवानगी आहे.
जर तुमच्याकडून पास हरवला तर तुम्हाला महामंडळातर्फे दुसरा पास मिळणार नाही आणि त्या बदल्यात तुम्हाला पैसेही परत मिळणार नाहीत.
परिवहन महामंडळाने दिलेल्या पास गैरवापर होत असल्यास आणि ते लक्षात आल्यास तुमचा पास जप्त केला जाईल.
प्रवासामध्ये तुमच्या सोबत असणाऱ्या वस्तू गहाळ झाल्यास किंवा चोरी झाल्यास महामंडळ त्याची जिम्मेदारी घेणार नाही.