RBI Saving Bank Rules

बचत खात्यांवर आयकर विभागाची नजर

एखाद्या व्यक्तीने एका आर्थिक वर्षात दहा लाखांपेक्षा जास्त रक्कम रोखीने जमा केल्यास आयकर विभागाकडे स्रोताची माहिती उघड करणे अनिवार्य आहे. तसेच खातेदाराक आपल्या उत्पन्नाचा स्रोत योग्य पणे सांगू शकला नाही तर ठेव रकमेवर ६०% कर, २५% अधिभार आणि ४% उपकर आकारला जाऊ शकतो.

लक्षात घ्या की दहा लाखांपेक्षा जास्त रोखीने व्यवहार होऊ शकत नाही असं नाही. तुमच्याकडे उत्पन्नाचा योग्य पुरावा असेल तर तुम्हाला कोणतीही चिंता करण्याची गरज नाही आणि सहज रोखीने व्यवहार करू शकता. परंतु बचत खात्यात मोठ्या प्रमाणात पैसे ठेवण्याऐवजी मुदत ठेव किंवा इतरत्र गुंतवणे फायद्याचे ठरू शकते जिथून चांगला परतावा मिळू शकतो.RBI Saving Bank Account Rules