आरबीआयनं स्पष्ट केलं की , 13 फेब्रुवारी 2025 ला बँकेचं कामकाज बंद झाल्यानंतर बँक आरबीआयच्या परवानगीशिवाय कोणतंही कर्ज देणार नाही किंवा अॅडव्हान्स रक्कम देईल किंवा कर्जाचं नुतनीकरण करणारन नाही. याशिवाय बँकेला ना गुंतवणुकीची परवानगी असेल ना ठेवी स्वीकारण्याची किंवा कोणतीही देणी देण्याची सूट असेल. बँकेत अलीकडच्या काळात घडलेल्या घटनांमुळं नियामक गोष्टी आणि बँकेच्या ठेवीदारांच्या हितांच्या रक्षणासाठी हा निर्णय घेतला आहे. याशिवाय पात्रताधारक ठेवीदार डिपॉजिटर्स डिपॉजिट इन्शूरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरशेनकडून त्यांच्या ठेवीवर 5 लाखर रुपयांपर्यंतच्या डिपॉजिट इन्शूरन्स क्लेम मिळवण्यास पात्र आहेत.