प्रवासी महिलेला ट्रेन खाली जाता जाता वाचवलं….. व्हिडिओ झाला तुफान वायरल

Railway platform viral video मुंबई लोकलला मुंबईकरांची लाईफलाईन म्हटले जाते. लाखो मुंबईकर रोज लोकलमधून प्रवास करतात. त्यामुळे लोकलमध्ये प्रचंड गर्दी असते आणि या गर्दीमुळे अनेकदा प्रवाशांना नाहक त्रास भोगावा लागतो. काहींना अपघातात प्राण गमवावे लागतात. पण असेही काही प्रसंग आहेत. जेव्हा रेल्वे सुरक्षा दल, पोलीस कर्मचारी यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचा जीव वाचवला आहे. मुंबईच्या चुनाभट्टी रेल्वे स्थानकावर अशीच एक घटना घडली आहे. एका महिलेला ट्रेनमधून पडताना महिला पोलीस हवालदाराने वाचविले. यावेळी महिला हवालदारही खाली पडली. काळजाचा ठोका चुकविणारा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

हार्बर रेल्वेच्या चुनाभट्टी रेल्वे स्थानकावर एक महिला प्रवाशी उतरत असताना तिचा ड्रेस लोकलमधील दुसऱ्या एका महिला प्रवाशाच्या बॅगेच्या चॅनमध्ये अडकला. यामुळे खाली उतरणाऱ्या महिलेचा तोल जाऊन ती धावत्या लोकलबरोबर खेचली गेली. लोकल सुरू झाल्यामुळे तिला लोकलमध्ये चढताही येईना आणि ड्रेस सोडविता येईना. त्यामुळे महिला चालत्या ट्रेनबरोबर धाऊ लागली.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

सदर घटना दि. ६ फेब्रुवारी रोजी दुपारच्या वेळेस घडली असून सीसीटीव्हीमध्ये हा थरार कैद झाला आहे. महिला लोकलबरोबर फरफटत जात असताना प्लॅटफॉर्मवरील प्रवाशी सदर महिलेला वाचविण्यासाठी धाव घेतल्याचे दिसते. तसेच काही अंतरावर महिला हवालदार रुपाली कदम उभ्या असतात. महिला प्रवाशी लोकलबरोबर फरफटत येत असल्याचे पाहून त्या विनाविलंब तिला बाजूला करतात. मात्र यात दोघीही प्लॅटफॉर्मवर कोसळतात. लगेच प्लॅटफॉर्मवर उभे असलेले इतर प्रवाशी त्यांना लोकलपासून मागे खेचून घेतात.

 

Leave a Comment