व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
गाडी रुळावर अडकून राहिल्याने अपघात टाळण्यासाठी मालगाडी ३५ मिनिटे थांबवण्यात आली. रेल्वे अधिकाऱ्यांनी रेल्वे पोलिसांना सूचना दिली मात्र चालक आणि चार प्रवासी आधीच घटनास्थळावरून निघून गेले होते. तसंच क्रेन वापरून कार काढण्यात आली आणि नंतर अधिकाऱ्यांनी चालकाला ताब्यात घेऊन कार ताब्यात घेतली. ही घटना ८ फेब्रुवारी रोजी अमरोहा उत्तर प्रदेश येथे घडली.
इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @brut.india या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “दारूच्या नशेत असलेल्या एका चालकाने त्याची गाडी चालवत थेट रेल्वे रुळावर आणली” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल २.८ व्ह्युज आले आहेत.