Maggie video goes viral मॅगी खायला फक्त लहान मुलांनाच नाही, तर मोठ्यांनासुद्धा आवडते.मॅगी हा असा पदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो.तुम्ही किंवा तुमची मुलं मॅगीप्रेमी असतील तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. बस दो मिनट…’ असे करीत ‘मॅगी’ तयार करणाऱ्या माधुरी दीक्षितची जाहिरात सर्वांनीच पाहिली असेल.
मात्र, ‘मॅगी’ आपल्या शरीरासाठी खूप घातक आहे. अशातच सध्या समोर आलेल्या व्हिडीओवरून दोन मिनिटांत तयार होणारी ‘मॅगी’ लहान मुलांसह मोठ्यांच्या आरोग्यालाही महाग ठरणार असल्याचे दिसत आहे. एका तरुणीने दावा केला आहे की, एका मॅगी नूडल्समध्ये जिवंत किडे होते. याचा किळसवाणा व्हिडीओही सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही मॅगी खाताना शंभर वेळा विचार कराल.
तुम्हीही जर भूक लागल्यावर झटपट बनणारी मॅगी सारखी खात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण, एका तरुणीला मॅगीमध्ये चक्क अळी आढळली आहे.या घटनेमुळे मॅगीबद्दल पुन्हा एकदा शंकेचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे तुम्हीही जर असे प्लास्टिकबंद खाद्यपदार्थ आणत असाल तर ते खाताना काळजी घ्या. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका तरुणीनं मॅगी बनवल्यानंतर ताटात घेऊन खात असताना अचानक तिला ही अळी दिसली.यानंतर पुावा म्हणून तिनं याचा व्हिडीओ काढला आणि सोशल मीडियावर अपडलोड केला. व्हिडीओमध्ये मॅगीमध्ये अळी स्पष्ट दिसत आहे, हा किळसवाणा व्हिडीओ पाहून तुम्हीही इथून पुढे मॅगी खाताना शंभर वेळा विचार कराल एवढं नक्की.