Cotton rates नमस्कार मित्रांनो आज आपण राज्यातील कापूस बाजार भाव पाहणार आहोत. राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते. मराठवाड्यामध्ये जास्त प्रमाणात याचे उत्पादन होते. ज्या भागात पाण्याची कमतरता आहे, अशा भागांमध्ये कापूस उत्पादन जास्त केले जाते.
कापूस पिके वार्षिक पीक असल्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होतो आणि शेतकरी याची जास्त लागवड करतात. कापसामुळे अनेकदा शेतकऱ्यांना फायदाही झालेला आहे. त्यामुळेच कापसाला शेतकऱ्यांचे पांढरे सोने असे म्हंटल जात.
दिवाळीच्या काळामध्ये कापसाच्या दरात थोडी घसरण झाली. कारण की आवक वाढली सणासुदीला पैशाची गरज असल्याने शेतकरी बांधवांनी कापूस बाजारपेठेमध्ये आणला आणि विकला. सध्या कापसाला खाजगी व्यापारामध्ये सहा हजार आठशे ते सात हजार भाव मिळत आहे.
शेतकरी मित्रांनो राज्यातील काही महत्त्वाच्या कापूस बाजारपेठांचे बाजारभाव खालील प्रमाणे दिलेले आहेत.
या बाजारभावांमध्ये तुम्हाला बाजार समितीचे नाव कमीत कमी दर जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर या सर्व गोष्टी पाहायला मिळतील.
आज दिवसभरातील कापूस बाजार भाव
बाजार समिती | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|
04/02/2025 | |||
अमरावती | 7075 | 7400 | 7237 |
सावनेर | 6950 | 6950 | 6950 |
राळेगाव | 7000 | 7200 | 7150 |
भद्रावती | 6200 | 7000 | 6600 |
समुद्रपूर | 6600 | 7080 | 6900 |
सिरोंचा | 6700 | 6900 | 6800 |
वर्धा | 6710 | 7100 | 6900 |
पारशिवनी | 6850 | 7075 | 6950 |
अकोट | 7150 | 7580 | 7500 |
घाटंजी | 6800 | 7105 | 7000 |
उमरेड | 6800 | 6980 | 6930 |
देउळगाव राजा | 6600 | 7145 | 7075 |
काटोल | 6700 | 7000 | 6950 |
सिंदी(सेलू) | 7050 | 7165 | 7100 |
बारामती | 5800 | 5800 | 5800 |
हिंगणघाट | 6900 | 7285 | 7180 |
बार्शी – टाकळी | 7421 | 7421 | 7421 |
नरखेड | 7400 | 7420 | 7410 |
मित्रांनो काही प्रमुख बाजारांच्या बाजारभावांची आपण आज माहिती घेऊ.
अमरावती बाजारपेठेमध्ये आज कापसाला कमीत कमी दर हा 7075 एवढा होता तर जास्तीत जास्त दर हा 7400 आणि सर्वसाधारण दर 7237 रुपये एवढा देण्यात आला. त्यानंतर मित्रांनो सावनेर या बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी दर 6,950 जास्तीत जास्त दर 6,950 आणि सर्वसाधारण दर 6,950 एवढाच देण्यात आला. त्यानंतर समुद्रपूर या बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी दर 6,600 जास्तीत जास्त 780 आणि सर्वसाधारण दर 6,900 एवढा देण्यात आला. अकोट या बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी दर 7150 जास्तीत जास्त 7580 आणि सर्वसाधारण दर 7500 एवढा देण्यात आला.
उमरेड या बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी दर 6800 मिळाला तर जास्तीत जास्त दर 6,980 आणि सर्वसाधारण दर 6930 एवढा मिळाला.
देऊळगाव राजा या ठिकाणी कापसाला कमीत कमी दर 6,600 जास्तीत जास्त 7145 आणि सर्वसाधारण दर 775 एवढा मिळाला.
काटोल्या बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी दर 6700 जास्तीत जास्त 7000 आणि सर्वसाधारण दर 6,950 एवढा मिळाला.
बारामती बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी दर सर्वसाधारण दर आणि जास्तीत जास्त दर हा सारखाच मिळाला तो म्हणजे पाच हजार आठशे रुपये.
हिंगणघाट बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी दर 6,900 जास्तीत जास्त दर 7285 आणि सर्वसाधारण जर 7180 एवढा मिळाला.
बार्शीटाकळी या बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी दर 7421 जास्तीत जास्त 7421 आणि सर्वसाधारण दर 7421 एवढाच मिळाला नरखेड बाजार समितीमध्ये कमीत कमी दर हा 7400 जास्तीत जास्त दर 7420 आणि सर्वसाधारण दर 7410 एवढा मिळाला
केंद्र सरकारने कापसाचा हमीभाव हा 7000 रुपये जाहीर केलेला आहे. पण सध्या कापसाच्या बाजारपेठेमध्ये कापसाचे दर उतरलेले आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कापसाचे दर वाढलेला आहेत आणि येणाऱ्या काळात राज्यातील दर वाढतील अशी अपेक्षा आहे.
सध्या शेतकऱ्यांना कापूस हा मी भावापेक्षा कमी भावाने विकावा लागत आहे. मध्यंतरी आलेली नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या कापसाचे नुकसान झाले त्यामुळे आता कापसांना दर जास्त भेटेल अशी अपेक्षा होती परंतु त्या पद्धतीने झाले नाही.
परतीच्या पावसामध्ये कापसाचे खूप मोठे नुकसान झाले. सध्या शेतकरी कापूस साठवत नसून डायरेक्ट बाजारामध्ये आणत आहेत. याचा फायदा व्यापारी घेऊन बाजार भाव कमी करत आहेत. शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने 2024-2025 साठी हमीभावामध्ये 501 रुपयांची वाढ केली होती. आणि या हंगामामध्ये कापसाला 7 हजार 121 रुपये हा मध्यम धाग्याचा आणि 7521 रुपये हा लांब धाग्याचा कापूस बाजार भाव जाहीर केला होता. यावर्षी मराठवाडा खानदेश विदर्भात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात आले आहे.