आता 1-2 गुंठ्यांमध्ये जमिनीची व्यवहार करता येणार ,तुकडे बंदी कायद्यात बदल

Tukade bandi kayda तुकडे बंदी कायद्याबद्दल राज्यामध्ये सध्या विविध चर्चा चालू आहेत आणि आता या तुकड्या बंद कायद्यातील सुधारण्याला आता अधिवेशनामध्ये मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे हे विधायक आता कायद्याच्या स्वरूपात बदलेल.

यामुळे आता राज्यात तुकड्यांमध्ये जमिनीचे व्यवहार हे नियमित होतील. आज आपण या ब्लॉगच्या माध्यमातून या कायद्यामध्ये करण्यात आलेल्या सुधारणा आणि नवीन बद्दल या दोन्ही गोष्टींची माहिती घेणार आहोत.

मित्रांनो सर्वात पहिला प्रश्न म्हणजे कोणते व्यवहार हे नियमित होणार तर त्याची माहिती घेऊ.

15 ऑक्टोंबर 2024 या रोजी राज्य शासनाने एक अध्यादेश जाहीर केला आणि त्यामध्ये असे सांगितले की 1965 पासून निवासी औद्योगिक किंवा वाणिज्य क्षेत्रामधील जमिनीच्या तुकड्यांमध्ये जे व्यवहार झाले. असतील त्या जमिनीच्या आता चालू असलेल्या बाजार भावाच्या प्रमाणे म्हणजेच रेडी रेकनर च्या दराच्या केवळ 5% रक्कम तुम्हाला भरावी लागेल आणि ही जमीन तुम्हाला आता नियमित करून घेता येईल.

याआधी पण ही योजना काम करत होती परंतु आधीच्या कायद्यानुसार जमिनीच्या बाजारभावाच्या 25% रक्कम भरावी लागायची. त्यामुळे या योजनेसाठी लोक जास्त प्रतिसाद देत नव्हते.

पाच टक्के रक्कम या निर्णयाला आता विधिमंडळाने नियम मान्यता दिली आहे. आणि हा नियम आता लागू होणार आहे या नियमाचे कायद्यात रूपांतर होईल आणि हा कायदा लागू होईल.

आता आपण कोण कोणते कारण दिलेले आहेत. यासाठी आपण गुंठ्यांमध्ये व्यवहार करू शकतो याची माहिती घेऊ.

महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य सरकार तर्फे राज्यातील सर्व विविध जिल्ह्यांमध्ये जिरायत जमिनीसाठी 20 गुंठे आणि बागायत जमिनीसाठी 10 गुंठे एवढं तुकड्याचे प्रमाण निश्चित करण्यात आलेला आहे. एक तुकडा म्हणजे दहा गुंठे किंवा वीस गुंठे.

परंतु काही कामांसाठी जसे की घर विहीर किंवा इतर काही काम करायचे असल्यास दहा गुंठे किंवा 20 गुंठे जागा ही खूप मोठी होते. आणि या कामांसाठी फक्त एक दोन तीन गुंठ्यांपर्यंतच जमीन लागते. आणि एक दोन तीन अशा गुंठ्यांमध्ये व्यवहार करताना सरकारकडून या गोष्टींमध्ये अडचण येत होती. आणि या विषयावर वेळोवेळी विधिमंडळात चर्चा करण्यात आली होती.

त्यामुळेच विधिमंडळामध्ये आमदारांनी प्रश्न उपस्थित केले की घर विहीर अशा कामांसाठी या कायद्यातून सूट मिळेल का ?

तर या संभाषणावरच राज्य सरकारने निर्णय घेऊन आता तुम्हाला एक दोन ते पाच गुंठ्यांपर्यंत जमिनीचा व्यवहार करता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या  जिल्ह्याच्या कलेक्टरकडे अर्ज करावा लागेल.

मित्रांनो खाली चार कारणे दिलेले आहेत त्या चार कारणांमध्ये तुम्ही गुंठ्यांमध्ये व्यवहार करू शकता.

जर तुम्हाला विहीर खोदायचे असेल तर तुम्ही पाच गुंठ्यांपर्यंत जमिनीचा व्यवहार करू शकता. त्यानंतर क्षेत्ररस्त्यासाठी सुद्धा पण तुम्ही जमिनीचा व्यवहार करू शकता.

केंद्र सरकारच्या घरकुल योजनेसाठी जर तुम्हाला जमीन घ्यायचे असेल तर तुम्ही ही जमीन 1000 चौरस फुटापर्यंत विकत घेऊ शकता.

आणि चौथ कारण म्हणजे सार्वजनिक कामांसाठी जमिनीचे भूसंपादन केल्यानंतर किंवा थेट खरेदी केल्यानंतर प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असलेल्या शिल्लक जमिनीसाठी व्यवहार करू शकतात.

Leave a Comment